शेतकरी सन्मान योजनेचे अर्ज करण्यास अडचणी

0

पालघर । राज्य सरकारने छत्रपति शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेचे ऑनलाईन अर्ज भरण्याचा प्रारम्भ केला मात्र हे अर्ज ऑनलाईन करण्यास अनेक अडचणी येत असून शेतकरी वर्गात नाराजिचे सुर उमटत आहेत. गेल्या दोन दिवसांपासून परिसरात पावसाने दमदार हजेरी लावली असून बळीराजा जरी एका बाजुने सुखावला असला तरी दुसर्‍या बाजुने कर्जमाफीच्या लाभार्थी शेतकर्‍यांची ऑनलाईन अर्ज भरायला महा ई सेवा केंद्र तसेच आपले सरकार केन्द्रावर लांबच लांब रांगा लावून ताठकळत दिवसभर भर पावसात उभे रहावे लागत असल्याने शेतकर्‍यांची भिक नको पण कुत्रा आवर अशी अवस्था झाली आहे.

शेतकरी करताहेत कसरत
कर्जमाफीसाठी शेतकरी संघटना आणि विरोधी पक्षाने रान उठवले, शेतकर्‍यांच्या भावनांचा आदर करीत शासनाने ही योजना घोषित केली.
विरोधकांसह सत्ताधारी पक्षाने कर्जमाफी श्रेय लाटण्यासाठी होर्डिंग्ज, बॅनर लावून मोठी प्रसिद्धी मिळवली खरी, पण प्रत्यक्षात या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी शेतकर्‍यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.

विहित नमुन्यातील अर्ज दाखल करताना वैयक्तिक माहिती, आधार कार्ड क्रमांक, रजिस्टर मोबाईल क्रमांक, पॅनकार्ड, पत्नीची माहिती, उत्पन्नाची माहिती नमूद करावी लागते. काही शेतकर्‍यांच्या पत्नीचे निधन झाले असल्याने अर्ज भरण्यासाठी अडचणी येत आहेत. तर काही शेतकरी लाभार्थी शेतकर्‍यांचेच निधन झाल्याने वारसाचे नाव सातबारा मध्ये नसल्याने मोठी अडचण निर्माण होत आहे.

ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी बर्‍याच गोष्टींची आवश्यकता आहे. मात्र शासनाचे शेतकर्‍यांना योग्य मार्गदर्शन नसलयाने शेतकरी हैराण झाले आहेत. शासनाने या कामाची मुदत वाढवणे आवश्यक असून, या बाबत्तीत शेतकर्‍यांचे प्रबोधन करणे गरजेचे आहे.
-अविनाश विष्णू पाटील,शेतकरी.