शेतकरी हितासाठी सदैव कटीबध्द राहणार

0

रावेर। कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रगतीसाठी संचालक मंडळ पारदर्शक कारभार करीत आहे. बाजार समितीच्या उत्पन्नात त्यामुळे भर पडली आहे. तसेच शेतकरी हिताला प्राधान्य देवून त्यांच्या समस्या सोडविर्‍यासाठी आम्ही कटीबध्द आहोत असे प्रतिपादन सभापती डॉ. राजेंद्र पाटील यांनी केले. ते समितीच्या सर्वसाधारण सभेत बोलत होते. बाजार समितीची सभा सभापती डॉ. राजेंद्र पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषद उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. सचिव गोपाळ महाजन यांनी अहवाल वाचन केले.

जिल्हा परिषद उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन, माजी नगरसेवक हरिष गणवाणी, बाजार समिती संचालक पितांबर पाटील, योगेश पाटील, गोपाळ नेमाडे, सैय्यद असगर, शेतकरी हिरामर पाटील यांनी चर्चेत सहभागी होऊन आपले विचार मांडले. यावेळी उपसभापती प्रमोद धनके, संचालक डि.सी.पाटील, अरुण पाटील, कैलास सरोदे, गोंडू महाजन, कल्पना पाटील, संगिता वाणी, अर्जुन महाजन, श्रीकांत महाजन, राजीव पाटील, निळकंठ चौधरी, कृष्णराज पाटील, योगेश पाटील, पितांबर पाटील, भागवत पाटील, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष सोपान पाटील, एल.डी. निकम आदी उपस्थित होते. योगेश पाटील यांनी आभार मानले.