जळगाव : शहरातील कासमवाडी भागातील आठवडे बाजारासाठी आलेल्या शेतकर्याचा 25 हजारांचा मोबाईल लंपास चोरट्यांनी लांबवला. एमआयडीसी पोलिसात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल
जळगावातील रायसोनी नगरात लालचंद बाजीराव पाटील (50) हे वास्तव्यास असून शनिवारी लालचंद पाटील हे कासमवाडी परीसरातील आठवडे बाजारात आले असता चोरट्यांनी त्यांच्याकडील 25 हजार रुपये किंमतीचा मोबाईल लांबवला. हा प्रकार लक्षात आल्यानंतर लालचंद पाटील यांनी बाजारात शोध घेतला मात्र मिळून आला नाही. चोरीची खात्री झाल्यावर लालचंद पाटील यांनी एमआयडीसी पोलिसात तक्रार दिन्यानंतर अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल योगेश सपकाळे हे करीत आहेत.