Cheating of one and a half lakhs by buying onion from a farmer in Chahardi : Crime Against Two चोपडा : तालुक्यातील चहार्डी येथील शेतकर्याचा कांदा खरेदी करूनही त्यापोटीची रक्कम अदा न करणार्या दोघांविरोधात चोपडा शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
दोघांविरोधात गुन्हा दाखल
चोपडा तालुक्यातील चहार्डी येथील शेतकरी विजय रामदास सोनवणे यांनी एप्रिल 2022 मध्ये एकूण एक लाख 53 हजार रुपये किंमतीचा 17 टन कांदा हा गावातील उदय रमेश मोरे यांच्यावर विश्वास ठेवून त्यांचे नातेवाईक व संशयीत आरोपी राजू वाल्मीक कदम (रा.लासलगांव, ता. सटाणा, जि.नाशिक) यांना विक्री केला. त्यावेळी शेतकर्यास पाच हजार देण्यात आले मात्र उर्वरीत एक लाख 46 हजार रुपये नंतर देण्याचे आश्वासन देण्यात आले मात्र नंतर दोघा व्यापार्यांनी शेतकर्यास रक्कम देण्यास टाळाटाळ केल्याने फसवणूक केल्याची खात्री झाल्याने विजय रामदास सोनवणे यांनी चोपडा शहर पोलिसात तक्रार दिल्यानंतर दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस निरिक्षक अवतारसिंग चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार प्रदीप राजपूत करीत आहेत.