एरंडोल । शेतकर्यांचा सातबारा कोरा झाल्याशिवाय शासनाशी असलेला संघर्ष थांबणार नाही असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दीला. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व सर्व समविचारी पक्षांच्या वतीने काढण्यात आलेल्या संघर्ष यात्रेप्रसंगी ते बोलत होते. आमदार डॉ. सतीश पाटील यांच्यासंपर्क कार्यालयाजवळ तालुक्यातील शेतकर्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार तसेच काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संदीप पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार डॉ. सतीश पाटील यांचेसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विजय महाजन,राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष डॉ.राजेंद्र देसले यांनी विविध मागण्यांचे निवेदन उपस्थित असलेल्या प्रमुख नेत्यांना दिले.