चाळीसगाव। स्वामिनाथन आयोगाप्रमाणे शेतमालाला भाव देवुन शेतकर्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी अन्यथा सोमवारी 14 ऑगस्ट रोजी तालुक्यातील देवळी येथे शासनाचा निषेध करुन रास्ता रोको करण्याचा ईशारा चाळीसगाव तालुक्यातील शेतकर्यांनी दिला आहे. शेतकर्यांनी गुरुवारी 10 ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री यांना निवेदन पाठविले आहे. रयत सेना, सह्याद्री प्रतिष्ठानच्या वतीने तहसिलदार कैलास देवरे यांना निवेदन देण्यात आले आहे.
निवेदनावर विवेक रणदिवे, दिलीप घोरपडे, गणेश पवार, समाधान राठोड, सुभाष पाटील, पंढरीनाथ पाटील, शांताराम पाटील, पंडीत मिस्तरी, मच्छिंद्र पाटील, सिताराम पाटील, भूषण भामरे, लिलाधर पाटील, जितेंद्र पाटील, मधुसूदन पाटील, मिलींद पाटील, महेंद्र पाटील, किरण पाटील, अरुण पाटील, धनंजय पाटील, रोहीत पाटील, सुदर्शन पाटील, चैत्राम पाटील, मनोज पाटील, शांताराम सोनवणे, दगा पाटील, नाना पाटील, संजय पाटील, मधुकर पाटील, आशा पाटील, रविंद्र पाटील, शिवदास पाटील, महारु रणदिवे, पुंजाराम पाटील, कारभारी पाटील आदी शेतकर्यांच्या सह्या आहेत.