अक्कलकुवा। शेतकरी सुखी राहिला तर प्रजा सुखी राहणार ह्याची जाणीव सत्ताधारी पक्षातील मंत्र्याना असली पाहिजे. शेतकरी राजाची थट्टा करणार्या सरकारला त्याची जागा दाखवण्याची वेळ आली आहे. कर्जबाजारी झालेला शेतकरी आपल्या व्यथेत अडकला असताना त्यांच्याविषयी अपशब्द वापरणार्या लोकांना त्यांची जागा दाखवायला पाहिजे, असे प्रतिपादन शिवसेना जिल्हाप्रमुख आमश्या पाडवी यांनी शेतकरी मेळाव्याप्रसंगी बोलताना सांगितले.
मेळाव्याला कार्यकर्त्यांसह शेतकर्यांची उपस्थिती
येथील श्री महाकाली माता मंदिराच्या सभागृहात आयोजित मेळाव्यात जिल्हा उपप्रमुख हसमुख पाटिल, महिला आघाडीच्या जिल्हा संघटक रिना पाडवी, युवासेना जिल्हा अधिकारी विनोद वळवी, जिल्हा उपअधिकारी रोहित चौधरी, मनोज बोरसे, क्षेत्र प्रमुख विजय ब्राम्हण, तालुका प्रमुख जयप्रकाश परदेशी, धडगाव तालुका प्रमुख गणेश पराडके, नवापूर तालुका प्रमुख गणेश वडनेरे , तालुका संघटक संतोष पवार, अक्कलकुवा शहर प्रमुख नंदलाल चौधरी, धडगाव शहर प्रमुख मिनेश चव्हाण, लक्ष्मण वाडीले, गिरधर पाडवी, जिल्हा परिषद सदस्य संध्या पाटील, पंचायत समिती सदस्य दामसिंग वसावे, रामसिंग वसावे उपस्थित होते. यावेळी पाडवी यांनी बोलताना सांगितले की, कॅबिनमध्ये बसून शेतकरी राजाची अवहेलना करण्यापेक्षा त्यांना त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. कर्जमाफीसाठी रस्त्यावर उतरून आंदोलन देखील करण्याचे सांगितले. प्रास्तावना अक्कलकुवा तालुका प्रमुख जयप्रकाश परदेशी यांनी संचालन चंद्रकांत चव्हाण यांनी केले. यशस्वी करण्यासाठी शाकीब पठाण, दिपक मराठे, गोलु चंदेल, संजय ठाकरे यांनी प्रयत्न केले.