शेतकर्‍यांची नुकसान भरपाई मिळण्यासाठी शिवसेनेचा मोर्चा

0

मुक्ताईनगर। शिवसेनेतर्फे शेतकर्‍यांच्या उपस्थितीत शहरातील प्रवर्तन चौकात गुरुवार 13 रोजी सकाळी 10 रास्ता रोको करण्यात येणार आहे. यासंदर्भात शिवसेनेतर्फे तहसिलदार जितेंद्र कुंवर यांना निवेदन देण्यात आले आहे.

सतत 2 ते 3 वर्षापासून अवकाळी परिस्थिती, गारपीठमुळे शेतातील पिकांचे आतोनात नुकसान सोसणार्‍या शेतकर्‍यांना संपुर्ण कर्जमुक्तीची घोषणा, शेतकर्‍यांच्या शेतमालाला विना विलंब योग्य तो हमीभाव जाहीर करणे, संपूर्ण कर्जवसुली त्वरीत थांबविने, महावितरण आपल्या दारी योजनेतील सर्व डिमांडधारक शेतकर्‍यांची वीज जोडणी त्वरित करण्यात यावी तसेच तालुक्यात कमी दाबाने वीज पुरवठा होत आहे यामध्ये दुरुस्ती होवून सर्व शेतकर्‍यांना सुरळित वीज पुरवठा व्हावा आदी प्रमुख मागण्यासाठी रास्ता रोको आंदोलनास शेतकरी तथा शिवसैनिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.