शेतकर्‍यांची फसवणूक करणार्‍या कृषी विक्रेत्यांवर कारवाई करा

0

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे कृषी अधिकार्‍यांकडे मागणी

नवापुर । शेतकर्‍यांची फसवणुक करणार्‍या कृषिसाहित्य विकणार्‍यांवर नवापुर तालुक्यातील विक्रेत्यांवर कडक कार्यवाही करण्याची मागणी नवापुर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे निवेदनाद्वारे तालुका कृषी अधिकारी वसंत चौधरी व पं.स कृषी अधिकारी शिरीष कोकणी यांना करण्यात आली आहे. यावेळी नवापुर राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

यांची होती उपस्थिती
निवेदनावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष राया मावची, तालुका अध्यक्ष विनायक गावीत,यशवंत गावीत, दिलीप गावीत, दिवांजी गावीत, गणपत वळवी, विजेसिंग गावीत, शिवदास वळवी, धिरसिंग पाडवी, विनायक गावीत, उदेश गावीत, रामु गावीत, कुश गावीत, कर्मा गावीत, जयसिंग वसावे यांचा सह्या आहेत.

शेतकर्‍यांना नुकसान भरपाई द्या
नवापुर तालुक्यातील शेतकर्‍यांनी ९ नंबर वाण ज्वारी बियाणे पेरणी केली होती. परंतु या ज्वारीच्या पिकाला कणसे लागले नाही व ज्वारीची उंची नियमितपेक्षा जादा वाढ झालेली आहे. यामुळे नवापुर तालुक्यातील शेतकर्‍यांचे आर्थिक नुकसान व फसवणुक झालेली आहे. याकामी आपण प्रत्यक्ष शेतकर्‍यांच्या बांधावर जावुन पाहणी करुन चौकशी करावी तसा पंचनामा करुन कृषिसाहित्य व बियाणे विकणार्‍यांवर योग्य ती कडक कार्यवाही करावी व ज्या गरीब शेतकर्‍यांचे नुकसान झाले आहे त्यांना नुकसानभरपाई तात्काळ मिळवुन द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे.