अमळनेर । राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते माजी मुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी अमळनेर येथील सभेत शेतकर्यांच्या मुलीने केलेली आत्महत्या आणि जालन्यातील शेतकरी दाम्पत्यानं केलेली आत्महत्या ही दुर्दैवी असल्याचे सांगितले. त्यांची मुले उघड्यावर पडली आहे. याला जबाबदार कोण? असा सवाल सरकारला केला. आपण किती काळ शांत बसणार, किती काळ बघ्याची भूमिका घेणार? आता पेटून उठण्याची गरज आहे, असे आवाहन त्यांनी शेतकर्यांना केले. सरकार शेतकर्यांच्या जखमेवर मीठ चोळत आहे. कांद्याला एक रुपया अनुदान दिले जात आहे. एका रुपयात काय होणार, शेतकर्यांना तुम्ही भिखारी समजता का? आत्महत्या थांबण्यासाठी ह्या सरकारने काहीच केलं नाही. पैशासाठी मतदान करू नका, आतातरी जागे व्हा, असा सल्ला दिला. यावेळी तालुक्यातील शेतकरी बांधवांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.