जळगाव। सरकार शेतकर्याच्या पाठीशी उभे असून विरोधकांनीदेखील समजून घेण्याची गरज आहे. शेतकर्याशी मुख्यमंत्र्यांनी बोलल्याशिवाय तोडगा निघणार नाही. चर्चेतून मार्ग काढून कजमाफी द्यावी, अशी मागणी पत्रकार परिषदेमध्ये केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी जळगावात केली यावेळी जलसंपदामंत्री गिरीश महाजन, खासदार ए टी पाटील, रिपाइंचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष रमेश मकासरे, जिल्हाध्यक्ष आनंद बाविस्कर, महानगर अध्यक्ष अनिल अडकमोल उपस्थित होते.
समजून घेण्याचा विरोधकांना सल्ला
मुख्यमंत्र्यांच्या घरावर बॉम्ब फेकण्याचें वक्तव्य करणारे आमदार बच्चू कडू यांच्या बाबत ना. आठवले यांनी बच्चू कडू अॅक्टीव्ह आमदार असून मुख्यमंत्र्याच्या घरावर बॉम्ब टाकणे हे त्यांचे वक्तव्य मात्र चुकीचे असल्याचे ना.रामदास आठवले म्हणाले. सरकारला तीन वर्षे पूर्ण होताना आतापर्यत पंतप्रधान मोदी यांनी अनेक योजनाचा शुभारंभ केला. त्यामुळे लोकांपर्यत योजना पोहचविण्याची जबाबदारी आमच्यावर आहे. देशात प्रत्येक गरिबासाठी स्वत:चे घर देण्याचा संकल्प सरकारने केला असून त्याचा शुभारंभ जळगाव महापालिकेच्या वतीने करण्यात आला असल्याचे ना.आठवले म्हणाले, जनधन योजनेच्या माध्यमातून 26 कोटी खाते उघडले गेले. मुद्रा योजनेच्या फायदा मोठ्या प्रमाणात बेरोजगार तरुणांना होत आहे. उज्वला योजनेत महिलांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. सरकारने केलेल्या योजना यशस्वी ठरत असल्याचे ना.आठवले यांनी सांगितले. आरक्षणाबाबत सरकार सकारात्मक आहे. ओबीसी समाजाला आरक्षण देण्याचा विचार सरकार करीत आहे. ओबीसी मंत्रालय स्थापन करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असताना केंद्राकडून हिरवा कंदील मिळण्याची शक्यता असून ते राज्यसभेत मंजुरीला पाठविले जाणार आहे. दिव्यांगासाठी स्वतंत्र मंत्रालयाची मागणी करत 500 कोटी कर्ज सरकार वितरीत करीत असल्याचे ना.रामदास आठवले यांनी सांगितले.