धरणगाव । शासनाने नुकतेच जाचक अटी लागू करत अल्पभूधारक शेतकर्यांचे कर्ज माफी करण्याचा निर्णय घेतला असून या निर्णयामुळे अल्पभूधारक आणि इतर शेतकर्यांमध्ये फुट पाडण्यासारखे असून शासनाचा हा निर्णय अमान्य आहे. मात्र राज्य शासनाने शेतकर्यांची सरसकटकर्जमाफी करावी अशी मागणी धरणगाव शिवसेनातर्फे तहसिलदारांना निवेदन देण्यात आले.
जाचक अटी रद्द करा
निवेदना म्हटले आहे की, महाराष्ट्रात कधी नव्हे ऐवढा शेतकरी कर्ज मुक्तीसाठी रस्तावर उतरलेला असून शिवसेनेने या मोर्चाला पाठिंबा दिला असल्यामुळे शासनाने कर्जमाफीचा निर्णय घाईघाईने घेतला असून शेतकर्यांना पेरणीला 10 हजार रूपये देवू घोषीत केले होते. तसेच काही ठिकाणी जाचक अटी लागू करून बरेचसे शेतकरी कर्जमुक्तीपासून वंचीत राहणार असल्यामुळे शिवसेनेला व सुकाणू समितीला या अटी मान्य नसून सरसकट कर्ज माफ करावे अशी मागणी केली आहे. अन्यथा तिव्र आंदोलन करण्याचा इशारा शिवसेनेतर्फे देण्यात आला आहे.
यांची होती उपस्थिती
शिवसेना जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ, नगराध्यक्ष सलिम पटेल, शिवसेना गटनेता विनय भावे, नगरसेवक वासुदेव चौधरी, सुरेश महाजन, भागवत चौधरी, अहमद पठाण, अजय चव्हाण, माजी नगराध्यक्ष सुरेश नाना चौधरी, उपतालुका राजेंद्र चौधरी, शहरप्रमुख राजेंद्र महाजन, भरत महाजन, रवींद्र जाधव, संजय चौधरी, संतोष महाजन, विलास महाजन, दिपक पाटील, धिरेंद्र पुरभे, बुट्या पाटिल, जितेंद्र धनगर, डॉ. विलास माळी, नंदकिशोर पाटील, कमलेश बोरसे, सुनील भाऊ चौधरी, पप्पू कंखरे, गोलू चौधरी, राहुल रोकडे, बापु महाजन, गोपाल महाजन, पप्पू चौधरी, वसीम पिंजारी, लक्ष्मण माळी, करण वाघरे सर्व शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.