रावेर। केळी उत्पादक नेहमी नाडला जातो. तेव्हा शेतकरी बांधवासाठी काही तरी करावे या हेतूने रावेर केळी बोर्डाची स्थापना करण्यात येवून या माध्यामातुन केळी भाव ठरविणे, शेतकर्यांना पैसा उपलब्ध करणे व केळीवर प्रक्रिया उद्योग उभारणे यासह अन्य बाबींद्वारा शेतकर्यांचे जिवनमान उंचावणेसाठी रावेर बोर्डाच्या माध्यामातुन प्रयत्न केले जातील अशी माहीती सानिया कादरी यांनी रावेर येथे पत्रकारांशी बोलतांना दिली. यावेळी त्यांच्या सोबत परिसरातील शेतकरी उपस्थित होते.
शेतकर्यांची फसवणूक
रावेरची केळी अशी ओळख असलेल्या परिसरातील शेतकरी मात्र विविध अडचणीत आहेत. यात काही व्यापार्यांकडूनही शेतकर्यांची फसवणुक होते. महाराष्ट्रातील केळीचा भाव बर्हाणपुर बोर्ड ठरवितो. त्यातही कमी भाव दाखवून कापणी होते. यामुळे भावात तफावत होते. भाडे, कमिशन, विविध चर्चेमुळे शेतकर्यांची पिळवणुक होते. त्यातच व्यापार्यांकडे पैशांसाठी चकरा माराव्या लागतात.
शेतकर्यांना 2 टक्के व्याजाने पैसे पुरविणार
शेतकर्यांना त्यांच्या मालाचे पैसे जागेवरच रास्त भावाने मिळणे त्यांच्या बँक खात्यात जमा व्हावे, तसेच मालाचा भावही स्वतः शेतकर्यांनी ठरवावा यासाठी रावेर येथे जिल्हास्तरीय केळी बोर्डाची लवकरच स्थापना करण्यात येईल अशी माहिती सानिया कादरी यांनी देवून बोर्डाच्या माध्यमातुन केवळ 2 टक्के व्याजाने शेतकर्यांना पैसे पुरविले जातील. जेणेकरुन त्यांना शेतीसाठी त्यांचा उपयोग होवून मालाची कापणी आधीच त्यांच्या खात्यात पैसे मिळतील अशी व्यवस्था होईल असे त्यांनी सांगुन सदर बोर्डाचे 10 सदस्य हे बोर्ड चालवतील. व केळी भाव काढतील. आपण याचे संस्थापक राहू. यासह परीसरातील शेतकरी बांधवही याचे सभासद राहतील. या बोर्डाची लवकरच स्थापना होवून पुढील काळात बँक व केळी मालावर प्रक्रिया उद्योग उभारला जाईल. केळीसह शेतकर्यांच्या अन्य उत्पादीत मालासाठीही आम्ही मध्यस्थ म्हणुन सहकार्य करत आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी शेतकरी प्रविण गंभीर महाजन, सुनिल महाजन, प्रविण पाटील सुनिल पाटील विलास पांडे,अनिल महाजन, दिलीप पाटील, अनिल खाचने, अनिल पाटील आदी शेतकरी उपस्थित होते.