शेतकर्‍यांचे व्यापार्‍यांविरोधात आंदोलन

0

शहादा । राज्य शासनाने हरभरा व गहु या पिकांना हमी भाव जाहीर केला असतांनाही शहादा तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीतील व्यापारी हमी भावापेक्षा कमी दराने शेतकयांकडून माल खरेदी करीत असून शेतकऱ्यांची फसवणूक करीत असल्याची स्वाभिमानी शेतकरी संघटनेने शेतकऱ्यांसह व्यापाराच्या विरोधात आंदोलन सुरु करुन लिलाव प्रक्रिया बंद पाडली आहे.

शेतकर्‍यांची आर्थिक लुट
राज्य व केंद्र शासनाने हरभरा पिकाला 4 हजार 400 प्रती क्विंटल हमी भाव जाहीर केलेला असतांनाही कृषी उत्पन्न बाजार समितीत व्यापारी 4 हजार ते 4100 रुपरे प्रती क्विंटल रा दराने शेतकऱ्याकडून कडून हरभऱ्याची खरेदी करीत आहे. परिसरात हरभरा पिकाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन झाले आहे. परिणामी व्यापारी शेतकऱ्यांकडून हमी भावापेक्षा कमी दराने खरेदी करुन आर्थिक लुट करीत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.