शेतकर्‍यांच्या कर्जमाफीसाठी धडगावात भव्य मोर्चा…!

0

नंदुरबार । शेतकर्‍यांच्या कर्जमाफीसाठी धडगांव येथे आ.अ‍ॅड.के.सी.पाडवी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या वतीने भव्य मोर्चा काढण्यात आला.

यावेळी राज्य व केंद्र सरकारच्या पुतळयाचे दहन करण्यात आले. मोर्चाला मानसिंग स्टेडियमपासून सुरुवात करण्यात आली. यावेळी आ पाडवी यांनी सध्याचे भाजपचे सरकार आदिवासी विरोधी सरकार असून संघाच्या आदेशाने चालणारे सरकार असल्याने आदिवासींसाठी ते धोक्याचे असल्याचे म्हटले. शेतकर्‍यांचे कर्जमाफी झालीच पाहिजे अशी मागणी त्यांनी केली. यावेळी मोठ्या संख्येने आदिवासी बांधव उपस्थित होते. यावेळी अनेक मान्यवरांनी उपस्थित जन समुदायाला मार्गदर्शन केले.