रावेर। राज्यात अल्पभुधारक शेतकर्यांना सरकारने संपूर्ण कर्जमाफी देवून मोठा दिलासा दिला आहे. सरकारच्या या निर्णयाचा येथील भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी फटाके फोडून जल्लोष केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मंत्रीमंडळाने अल्पभुधारक शेतकर्यांचे पीककर्ज माफ करुन सातबारा कोरा केला. या निर्णयाचे स्वागत राज्यभरात केले जात आहे. येथील भाजपा कार्यकर्त्यांच्या वतीने आमदार एकनाथराव खडसे यांच्या संपर्क कार्यालयासमोर फटाके फोडून जल्लोष करण्यात आला.
सरकारच्या योजनांची दिली माहिती
याप्रसंगी जिल्हा परिषद माजी शिक्षण व आरोग्य सभापती सुरेश धनके यांनी राज्य सरकारच्या तीन वर्षातील उपलब्धी व योजनांची माहिती दिली.
यांची होती उपस्थिती
यावेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन, जिल्हा उपाध्यक्ष पद्माकर महाजन, तालुकाध्यक्ष सुनिल पाटील, संजय गांधी निराधार योजना समिती अध्यक्ष शिवाजीराव पाटील, जिल्हा परिषद सदस्य कैलास सरोदे, जिल्हा परिषद सदस्या नंदा पाटील, रंजना पाटील, भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष अमोल पाटील, प्रल्हाद पाटील, सावदा शहराध्यक्ष पराग पाटील, अनुसुचित जाती तालुकाध्यक्ष संतोष वाघ, तालुका उपाध्यक्ष नरसिंग पवार, भाऊराव चौधरी, श्रीकांत महाजन, हरलाल कोळी, भूषण पाटील, वासु नरवाडे, महेश चौधरी आदी उपस्थित होते.