काशी एक्स्प्रेससमोर जोरदार घोषणाबाजी ; पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
रावेर (प्रतिनिधी)- वादळग्रस्त केळी उत्पादकांना नुकसान भरपाई द्यावी, जळगाव व वाकडीच्या दोषी आरोपींना शिक्षा व्हावी, सचखंड, महानगरी एक्सप्रेस गाड्यांना रावेर येथे थांबा द्यावा, फैजपूरच्या गरीबांना घरकुल द्यावे आदी मागण्यांसाठी सोमवारी दुपारी पीपल्स रिपब्लिकन पार्टी तर्फे रेल रोको आंदोलन करण्यात आले. आंदोलनादरम्यान पोलिसांतर्फे कडेकोट बंदोबस्त राखण्यात आला.
यांची होती उपस्थिती
काशी एक्स्प्रेस आल्यानंतर पीआरपीचे प्रदेश महामंत्री जगन सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली केळीचे घड पदाधिकार्यांनी खांद्यावर घेत मोदी सरकाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. याप्रसंगी स्टेशन मास्तरांना निवेदन देण्यात आले. पीआरपी तालुकाध्यक्ष शांताराम तायडे, शेख अमजद, गजानन चर्हाटे, आसीफ शेख, शाबीद शेख, बब्बू शहा, सादीर मौलाना, संगीता ब्राम्हणे, चंद्रकला कापडे, कलीम शेख, महेंद्र पाटील, हरीष सुरवाडे, प्रल्हाद गायकवाड आदी पीआरपी संघटनेचे कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते.
यांनी ठेवला चोख बंदोबस्त
रावेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नरेंद्र पिंगळे, फौजदार दीपक ढोमणे, भुसावळ रेल्वे यार्डचे ज्ञानेश्वर पाटील, भुसावळ लोहमार्गचे निरीक्षक दलीप गढरी, फौजदार जी.एच.यादव, पोलीस निरीक्षक् प्रवीण शिंदे, चिंतामण अहिर यांच्यासह स्थानिक पोलीस, आरसीपीची प्लाटून, रेल्वे सुरक्षा बलाचे कर्मचार्यांनी चोख बंदोबस्त राखला.