जामनेर । तालूका काँग्रेसच्या वतीने शेतकर्यांचे 2017 पर्यंतचे कर्जाची सरसकट माफी, शेती मालास उत्पादन खर्चाच्या आधारावर हमी भाव मिळावा, जामनेर तालूका दुष्काळग्रस्त म्हणून जाहिर करावा, स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत जिवघेण्या स्वच्छालयांची कामे बंद करावीत, सतत होणारी पेट्रोल, डिझेल दरवाढ थांबवावी, तालूक्यातील अपुर्ण पाणीपुरवठा योजना तात्काळ पुर्ण करण्यात याव्या यांसारख्या मागण्या आदी मागण्या शासनाकडे पोहचविण्यासाठी तहसिलदार कार्यालयावर मोर्चा काढून तहसिलदार यांच्याकडे लेखी निवेदन देण्यात आले.
यांची होती उपस्थिती
यावेळी शंकर राजपूत, शरद पाटील, प्रविण पाटील, मुलचंद नाईक, गणेश झाल्टे, अ.रऊफ शे.महेमुद, रघूनाथ धनगर आदींच्या निवेदनावर स्वाक्षर्या आहेत.तालुक्याचा गुरुवार रोजी बाजार असुनही मोर्चा आंदोलनाला मात्र अल्प प्रतिसाद मिळाल्याने काँग्रेसचे हे आंदोलन अपयशी ठरले असल्याची चर्चा शहरात चर्चीली जात होती. पदाधिकारी, कार्यकर्त्यांपेक्षा बंदोबस्तला असलेला पोलिस फौजफाटाच जास्त असल्याचे दिसून आले.