चाळीसगाव । शेतकर्याचा सर्वांगीण विकास होण्यासाठी जलयुक्तशिवार अभियान राबविण्यात येत असून या अभियानामुळे महाराष्ट्राची देशपातळीवर वेगळी ओळखनिर्माण झाली असल्याचे प्रतिपादन जलसंधारण व राजशिष्टाचार, विमुक्तजाती, भटक्याजमाती, इतरमागासवर्ग व विशेषमागास प्रवर्गकल्याणमंत्री प्रा.राम शिंदे यांनी केले. तालुक्यातील वाघळी येथील जलयुक्तशिवार योजनेंतर्गत बांधण्यात आलेल्या सिमेंट नालाबंधार्यांची पाहणी करतांना ते बोलत होते. यावेळी आमदार उन्मेश पाटील, शिक्षण समिती सभापती पोपटतात्याभोळे, पंचायत समिती सभापती स्मितल बोरसे, उपविभागीय अधिकारी शरद पवार, तहसिलदार कैलास देवरे, तालुका कृषि अधिकारी आर. एम.राजपूत, जिल्हा परिषद लघुसिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता आर.के.नाईक, कनिष्ठ अभियंता चंद्रकांत शिंपी आदी उपस्थित होते.
विविध योजना
जलयुक्तशिवार अभियानांतर्गत बांधण्यात आलेल्या बंधार्यातील साठलेले पाणीपाहून शेतकर्यांच्या चेहर्यावर समाधान दिसत आहे. या अभियानामुळे परिसरातल्या विहीरींच्या पाण्याची पातळीत वाढ झाली आहे. शेतकर्यांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध झाल्यामुळे त्यांच्या उत्पादनात वाढू होवून त्यांचा विकास होणार आहे. शेतकरीसमृध्द झाला तर देशसमृध्द होईल म्हणून राज्यशासन शेतकर्यांसाठी विविधयोजना राबवित असल्याचे ना.शिंदे यांनी सांगितले.
फलकाचे अनावरण
या योजनांचा शेतकर्यांनी लाभ घेवून आपला विकास साध्य करावा असे आवाहनही त्यांनी केले. जलसंधारण विभागामार्फत चाळीसगाव तालुक्यातील वाघळीयेथे 47.70 लक्ष रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या सिमेंट नालाबंधारा, वाघळी येथील मधुई देवीजवळ 47.61 लक्ष रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या सिमेंटनाला बंधार्यांच्या फलकाचे अनावरण ना.शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांच्या हस्तेबंधार्यातील पाण्याचे जलपुजन करण्यात आले. पातोंडा गावी ग्रामपंचायतमार्फत सरपंच सचितानंद जाधव यांच्या हस्ते ना.शिंदे यांचा सत्कार करण्यात आला.