शेतकर्‍यांच्या सुविधेसाठी शासनस्तरावर पाठपुरावा करणार

0

जळगाव । नशिराबाद येथिल लेवा समाज मंगलकार्यालयात झालेल्या या बैठकीच्या अध्यक्षस्थानी माजी पालकमंत्री आप्पासाहेब गुलाबराव देवकर हे होते. नशिराबाद, बेळी, निमगाव, भागपूर, कंडारी, उमाळे, कुसुबा, जामनेर तालुक्यातील नेरी, गाडेगाव व इतर गावांना तर भुसावळ तालुक्यातील सुनसगाव, बेल व्हाय, वराडसिम, गाजोरे, कुर्‍हे पानाचे, मांडवे दिगर शिंदी, सुरवाडे, खंडाळा, मोंढाळा अशा अनेक गावानजिकच्या शेती शिवारात नील गाई व रान डूक्कर सारख्या वन्य प्राण्यांच्या मुक्त संचारामुळे शेतकरी हैराण झाले होते. या बैठकीत पंकज महाजन, जि.प. सदस्य लालचंद पाटील, पंढरीनाथ राणे, अरूण पाटील, प्रभाकर कावडे, भागपूरचे पोलीस पाटील, किर्तीकांत चौबे यांच्यासह इतर शेतकर्‍यांनी आपली व्यथा मांडत वनविभागावर रोष व्यक्त केला.

यावर आपण कायदा हातात न घेता तक्रार असलेल्या शेतकर्‍यांच्या शेतात घुसणार्‍या या वन्यप्राण्यांना मारण्यासाठी आपण जिल्हा रायफल असोशियशनचे प्रशिक्षित कर्मचार्‍याची मदत घेऊ, या शिवाय वनविभागाला तारेचे कुंपन, पाणी तळे सह इतर सुविधासाठी शासनस्तरावर पाठपुरावा करू असे, अश्वासन जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर व वन विभागाचे अधिकारी श्री रेड्डी यांनी शेतकर्‍यांना दिले. तसेच यापुढे नुकसान भरपाईचे पंचनामे व इतर सुविधा वन विभागाककून तत्काळ पुरवण्यात येतील असे श्री रेड्डी यांनी सागितले.

मोर्चा धडकला
याबाबत शासनाचे लक्ष वेधण्यासाठी वनविभागाच्या प्रशासना विरोधात गुलाबव देवकर व नाशिराबादचे माजी सरपंच पंकज महाजन यांच्या नेतृत्वाखाली शेकडो शेतकर्‍यांच्या मोर्चा 5 जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला होता. यावेळी जिल्हाधिकार्‍यांनी दिलेला शब्द पाळत मंगळवारी 20 जून रोजी सामाजिक वन विभागाचे वनसंरक्षक अधिकारी रेड्डी यांच्यासह वनसंरक्षकांच्या उपस्थितीत या वर नेमका काय तोडगा काढता येईल या बाबत हैराण शेतकर्‍यांची बैठक आयोजित केली होती.