मुंबई : राज्यात शेतकर्यांचें सरसकट दीड लाख रुपयांपर्यंत कर्ज माफ करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. मंत्रिमंडळाच्या बैठकीत कर्जमाफीवर निर्णय घेण्यात आला. ‘छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजना’ असें नाव देण्यात आले आहे. नियमित कर्ज भरणार्या शेतकर्यांना 25 टक्के रक्कम (25 हजार रुपये कमाल मर्यादा) अनुदान दिले जाणार आहे. जूनपर्यंत कर्ज भरणार्या शेतकर्यांनाही प्रोत्साहनपर अनुदान दिले जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
89 लाख शेतकर्यांना फायदा
राज्य सरकारने 34 हजार कोटी रुपयांची कर्जमाफी केली आहे. या कर्जमाफीचा 89 लाख शेतकर्यांना फायदा होणार आहे. कर्जमाफीमुळे 90 टक्के शेतकर्यांचा सातबारा कोरा होईल आणि उर्वरित 6 टक्के शेतकर्यांच्या कर्जाच्या परतफेडीत दीड लाख रुपये राज्य सरकारचा वाटा असेल, असेही मुख्यमंत्री म्हणाले. आजी-माजी मंत्री, क्लास वन अधिकारी, करदाते, व्हॅट पात्र व्यापारी यांना कर्जमाफीतून वगळले आहे. भाजपचे मंत्री आणि आमदार कर्जमाफीसाठी एक महिन्याचा पगार देणार आहेत.