मुरबाड । राज्यात गेल्या 10 महिन्यांपासून कर्जमाफीचा घोळ सुरूच आहे. मात्र, शेतकरी मायबापाला कर्ज कधी मिळणार व आपल्या खात्यात पैसे कधी जमा होणार, याकडे बळीराजाचे लक्ष लागून राहील आहे. कर्जमाफीचा सरकारने राज्यात बट्ट्याबोळ केला आहे. सरकारकडून कर्जमाफीसाठी आता तारीख पे तारीख अशी घोषणा सुरू आहे. परंतु, प्रत्यक्षात ठाणे जिल्हा मध्यवर्ती सरकारी बँकेच्या ( टीडीसीसी) 33883 खातेदार शेतकर्यांना कर्जमाफीचा लाभ मिळालाच नसल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. त्यामुळे ठाणे जिल्हा सत्ताधारी पक्षाला कोंडीत पकडण्याची विरोधकांना चांगलीच संधी आली आहे. अशा प्रतिक्रिया जिल्ह्यात उमटत आहेत. त्यामुळे सत्ताधारी भाजप जिल्हा परिषद तसेच पंचायत समिती निवडणुकीत कोणते डाव खेळले जातील हे पाहणे तितकेच उत्सुकतेचे ठरणार आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत राजकीय वातावरण तापणार आहे.
सत्ताधार्यांना कोंडीत पकडण्याची संधी
ठाणे जिल्हा मध्यवर्ती शाखेच्या 59 शाखेमध्ये 33883 शेतकरी खातेदार आहेत. या शेतकर्यांना 1.5 लाखाची कर्जमाफीची सवलत असताना ही तसेच कर्ज फेड करणार्यांना 25 हजार रुपयांची प्रोत्साहन अनुदानाचाही लाभ मिळाले नसल्याचे चित्र समोर आले आहे. त्यामुळे होऊ घातलेल्या जिल्हा परिषद तसेच पंचायत समिती निवडणुकीत विरोधी पक्षाकडून या मुद्द्याला चांगलेच खतपाणी दिले जाणार आहे. त्यामुळे ठाणे जिल्हा सत्ताधारी पक्षाला कोंडीत पकडण्याची विरोधकांना चांगलीच संधी आली आहे. अशा प्रतिक्रिया जिल्ह्यात उमटत आहेत. त्यामुळे सत्ताधारी भाजप जिल्हा परिषद तसेच पंचायत समिती निवडणुकीत कोणते डाव खेळले जातील हे पाहणे तितकेच उत्सुकतेचे ठरणार आहे.
ऐन ठाणे जिल्हा परिषद व 5 पंचायत समितीच्या निवडणुकीत कर्जमाफीचा मुद्दा गाजणार असून सत्ताधारी पक्षांच्या उमेदवारांसाठी ही डोकेदुखी ठरणार आहे. त्यामुळे मुरबाड तालुकासह संपूर्ण ठाणे जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापणार आहे. कर्जमाफीची घोषणा होऊन जवळपास 9 महिने उलटून गेले आहेत, तरी शेतकर्यांच्या खात्यात रक्कम जमा झाली नाही. ठाणे जिल्ह्यात सत्ताधारी पक्षाचे 2 मंत्री, आमदार, खासदार असताना ही शेतकर्यांना त्यांच्या हक्काच्या लाभापासून वंचित राहावे लागले आहे. त्यामुळे ऐन निवडुकीच्या तोंडावर कर्जमाफीचा मुद्दा समोर आल्याने जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत याची किंमत सत्ताधारी पक्षाला मोजावी लागणार आहे. त्यामुळे सत्ताधारी उमेदवारांमध्ये चिंता मोठ्या प्रमाणात वाढली आहे.