अमळनेर। शासनाचे धोरण शेतकर्यांना तात्पुरता कर्जमाफी करणे नसुन कायमस्वरूपी शेतकरी वर्ग कर्जापासून मुक्त करण्याचं आहे. शेतीच्या विकासासाठी राज्य शासनाने मोठया प्रमाणात निधी उपलब्ध करून दिले आहे. माफक दरात बियाणे व खते उपलब्ध करण्यात येत असल्याचे शेतकर्यांना मोठ्या प्रमाणात मदत केली जात असल्याची माहिती आमदार स्मिता वाघ यांनी शिवार संवाद सभेत दिली. पंडित दीनदयाळ उपाध्याय जन्म शताब्धी वर्षा निमित्त भाजपातर्फे अमळनेर तालुक्यात शिवार संवाद सभेचे आयोजन करण्यात आले. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतुन राज्य सरकारने शेतीच्या श्वास्वत विकासासाठी केलेल्या कामाची माहिती शेतकर्यापर्यत पोहोचविण्याचे नियोजन केले आहे.
25-28 दरम्यान
भाजपातर्फे शिवार संवाद सभेचे अमळनेर तालुक्यात 25 ते 28 मे दरम्यान आयोजित करण्यात आले आहे. तीन दिवसात तालुक्यातील सर्व गावात भाजपा कार्यकर्ते जाणार आहे. पहिल्या दिवशी लोंढवे, मंगरूळ, वावडे, जवखेडे येथे शिवार संवाद सभा घेण्यात आली. दुसर्या दिवशी शुक्रवारी 26 रोजी सडावन, शिरुड, भरवस, टाकरखेडा, गडखांब, पातोंडा येथे सभा घेण्यात आल्या. तसचे तिसर्या दिवशी डांगरी, धार, नांदगाव, सावखेडा येथे सभा घेण्यात येणार आहे.
यांचा होता सहभाग
बाळासाहेब पाटील, जिजाबराव पाटील, हिरालाल पाटील, अॅड.व्ही.आर.पाटील, संदीप पाटील, डॉ.दीपक पाटील, प्रफुल्ल पवार, श्याम अहिरे, राजू पवार, दिनेश शिसोदे, राजेश वाघ, महेंद्र बोरसे, शितल देशमुख, राकेश पाटील, जिल्हा परिषद सदस्य सोनू पवार, संगीता भिल, पंचायत समिती सदस्य त्रिवेणीबाई पाटील, रेखाबाई पाटील, कविता पवार, भिकेश पाटील, यांचा सक्रिय सहभाग आहे.