शेतकर्‍यांना दिलासा : प्रधानमंत्री विमा योजनेबाबत आवाहन

0

भुसावळ- प्रधानमंत्री खरीप पीक विमा योजनेसाठी कर्जदार शेतकर्‍यांना 31 जुलै तर बिगर कर्जदार शेतकर्‍यांना 24 जुलैची मुदतवाढ मिळाल्याने शेतकर्‍यांमधून समाधान व्यक्त होत आहे. दरवर्षी या योजनेतून पीक विमा काढला जात असलातरी भरपाई मिळत नसल्याने योजनेविषयी एकूणच शेतकरी नाखुष असल्याचे चित्र आहे.
बिगर कर्जदार शेतकर्‍यांना विशिष्ट फॉर्म भरून पीकविमा त्यांच्या कुठल्याही बँक खात्यातून भरता येणार आहे. कृषी विभागात शेतकर्‍यांना मार्गदर्शनाकरीता व्यवस्था करण्यात आली आहे. पीक वम्याचा लाभ घेऊन मुदतीपर्यंत आपले अर्ज दाखल करण्याचे आवाहन कृषी अधिकार्‍यांनी केले आहे. कर्जदार शेतकर्‍यांचा विमा हप्ता बँकेतून परस्पर कपात करण्यात येणार आहे. या योजनते नैसर्गिक आपत्ती, भुस्खलन, कमी अधिक प्रमाणातील पाऊस आदींसह अन्य नैसर्गिक घटकांमुळे पिकांचे नुकसान झाल्यास भरपाई दिली जाणार आहे. दरम्यान, या योजनेत सहभाग सक्तीचा असल्याने विमा हप्ता रक्कमेची नाहक नासाडी होत असल्याचीही चर्चा शेतकर्‍यांमध्ये आहे.