शेतकर्‍यांना नुकसान भरपाई देण्याचे खासदारांना निवेदन

0

अमळनेर : जळगाव लोकसभा मतदारसंघाचे खासदार ए.टी. पाटील यांना मौजे बाम्हणे शिवारातील 100 ते 150 एकर जमीन रेल्वे लाईन लगत सांडपाणी गटार न बांधल्यामुळे पाण्याखाली आल्यामुळे शेतकर्‍यांचे प्रचंड नुकसान झाले असल्यामुळे त्वरित नुकसान भरपाई मिळावी व सांडपाण्याचे व्यवस्थापन करण्यात यावे अशी मागणी शेतकर्‍यांनी केली आहे. बाम्हणे रेल्वे गेट वाहतुकीस बंद असल्यामुळे कळंबू, मुडी, मांडळ, वावडे जाण्यासाठी वाहतूक बंद आहे. त्यामुळे या मार्गावरील एकमेव शिरपूर -नवलनगर एस.टी सुद्धा बंद आहे. बंद वाहतुक लवकरात लवकर सुरु करण्यात यावे या मागणीसाठी खासदार पाटील निवेदन देण्यात आले. पंचायत समिती सदस्य भिकेश पाटील, डॉ.दीपक पाटील, संजय पाटील, धर्मराज पाटील, लोटन राजपूत आदी उपस्थित होते.