नांदगाव । प्राचीन काळापासून शेतकरी हा शेतात शेती करत आला आहे. पिकांमध्ये होणारे वेगवेगळे बद्दल त्याने आत्मसात करून पिकांचे उत्पादन वाढवण्यात मोलाचा सहभागसुद्धा दिला आहे. परंतु, सद्या शेतात तयार केलेले पीक याला मार्केटिंग न मिळाल्यामुळे हा जगाचा पोशिंदा खूप मोठ्या अडचणीत सापडला आहे. यासाठीच शासनाकडून मार्केटिंग करण्यासाठी सक्षम सुविधा करण्यात आल्या पाहिजे. शेतकर्यांना 24 तास विजेचा पुरवठा तसेच त्याने उत्पादित केला.
शेतकरी कंपन्यांच्या पदाधिकार्यांना प्रमाणपत्र वाटप
यावेळी रायगड जिल्हा आत्मा अंतर्गत स्थानिक उत्पादक शेतकरी कंपन्यांच्या पदाधिकार्यांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. परिषदेच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य आंबा उत्पादक संघाचे अध्यक्ष चंद्रकांत मोकल यांनी पिकांवर होणारे विविध रोग व त्याचा होणारा परिणाम याविषयी माहिती दिली. उत्पादन वृद्धीसाठी फवारण्या व औषधांविषयी माहिती दिली. कोकणातील शेतकर्यांना माल विकण्यासाठी मध्यवर्ती ठिकाणी विक्री केंद्र उभारण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. शेततळ्याच्या कागदावर 28 टक्के, तर स्प्रे पम्पावर 18 टक्के जीएसटी आकारण्यात आला याला आपण विरोध करणार असून केंद्रशासनाकडे दाद मागू, असे मोकल यांनी सांगितले.
माल नेण्यासाठी सक्षम रस्ते निर्माण झाले पाहिजेत. त्याचप्रमाणे त्याला चांगल्या बाजारपेठा सुद्धा उपलब्ध करून दिल्यास भारतातील शेतकरी समृद्ध होईल असे प्रतिपादन डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे असोसिएट डीन डॉक्टर यू.व्ही. महाडकर यांनी केले.