शेतकर्‍यांना मिळणार नाही कर्जमाफी

0

भोपाळ । महाराष्ट्राबरोबरच शेतकरी आंदोलनाचे लोण आता मध्यप्रदेशमध्येही पोहोचले आहे. येथील आंदोलनाने हिंसक वळण घेतले असून गोळीबारात 6 शेतकर्‍यांचा बळी गेला आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे कृषीमंत्री गौरी शंकर बिसेन यांनी एक वादग्रस्त विधान केले आहे. ते म्हणाले की, शेतकर्‍यांना कर्जमाफी करणार्‍यांच्या बाजूने मी नाही. त्यांच्या या विधानाने राज्यात खळबळ माजली आहे. राज्य सरकारने शेतकर्‍यांकडून कोणत्याही प्रकारचे व्याज घेतलेले नाही. त्यामुळे कर्जमाफी कसली ? असा प्रश्न कृषीमंत्री गौरी शंकर बिसेन यांनी उपस्थित केला आहे.

या अगोदर मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान ट्वीटच्या माध्यमातून म्हणाले होते की, चर्चा केल्याने दोन देशातील प्रश्न सुटतात, येथे तर फक्त तुम्ही आणि मी आहे. त्यामुळे बिनधास्त येऊन माझ्याशी चर्चा करा. ते पुढे लिहितात, ममाझा हा उपवास शेतकर्‍यांच्या लढाईत त्यांच्यासोबत उभे राहण्याचे प्रतिक आहे, हा उपवास हिंसेच्या विरोधात आहे, हिंसा केल्याने कोणी माणूस होत नाही. दरम्यान, सरकारच्या निर्णयावर नाराज झालेल्या शेतकर्‍यांनी आजपासून जेलभरो आंदोलन सुरू केले आहे. तसेच शेतकरी गावोगावी जाऊन मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या विरोधात निदर्शनेही करणार आहेत.