नवापूर। नवापूर पंचायत समिती येथे जिल्हा परिषद शेष फंडातुन शेतकर्यांसाठी पीव्हीसी पाईप व सौर कंदिलांचे वितरण करण्यात आले. प्रति लाभार्थी पीव्हीसी पाईप 20 नग तसेच प्रति लाभार्थी सौरकंदील 1 नगाचे वितरण करण्यात आले. हा कार्यक्रम पं.स कार्यालयाचा सभागृह येथे जि.प अध्यक्षा रजनी नाईक, पं.स सभापती सविता गावीत, उपसभापती दिलीप गावीत, जि.प सदस्या संगिता गावीत, मालती नाईक, रतजी गावीत यांच्या उपस्थितीत करण्यात आला. यावेळी पं.स सदस्य जालमसिंग गावीत, विजय गावीत, किसु कोकणी, रशिला गावीत, यमुनाबाई वसावे, अप्सरा कोकणी, सुजिता गावीत, नंदकुमार वाळेकर आदी उपस्थित होते.
400 च्या वर शेतकर्यांना लाभ
यावेळी जि.प अध्यक्षा रजनीताई नाईक म्हणाल्या की या योजना वाटप करण्यात जरा उशिर झाला म्हणुन लाभार्थ्यांनी गैरसमज करु नये. लाभार्थ्यांना चांगल्या योजना देण्यास आम्ही कटिबद्ध आहोत. गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर यांनी नविन पं.स कार्यालयाची इमारतीचा प्रस्ताव सादर केला असुन लवकरच नविन भव्य अशी इमारत या ठिकाणी होणार आहे. तसेच नवापूर तालुका हा 95 टक्के हगणदारी मुक्त झाला असुन उरवरीत 3 टक्के धरुन 100 टक्के करण्याची सतत कारवाई सुरु आहे असे सांगितले. प्रस्तावना गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर यांनी तर सुञसंचलन विस्तार अधिकारी किरण गावीत व आभार कक्ष अधिकारी वाय. डी. सरदार यांनी मानले. या वेळी 126 शेतकर्यांना पी.व्ही.सी पाईप वाटप करण्यात आले तर सौर कंदील 239 लाभार्थ्यांना वितरीत करण्यात आले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कनिष्ठ सहायक रविंद्र साळवे, मोहन खेडकर यांनी परीश्रम घेतले.