शेतकर्‍यांना वेळेत बि-बियाणे खते द्या

0

धुळे। जिल्हयातील शेतकर्‍यांना आगामी खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर बि-बियाणे, रासायनिक खते वेळेत उपलब्ध करुन दयावेत. शेतकर्‍यांना कोणत्याही प्रकारे अडचण येवू देऊ नये असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.दिलीप पांढरपट्टे यांनी येथे दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात आज दुपारी खरीप हंगाम आढावा बैठक झाली त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी प्रकाश सांगळे, कृषी विकास अधिकारी बी.व्ही.बैसाणे, मोहीम अधिकारी, आर.एम.नेतनराव, जिल्हा गुणवत्ता नियंत्रक आर.डी.पाटील व तालुका स्तरावरील सर्व निरीक्षक उपस्थित होते.

यावेळी पेरणी क्षेत्र नियोजन, बि-बियाणे पुरवठा नियोजन, रासायनिक खते पुरवठा नियोजन व खत विक्रीचे नियोजन याबाबत आढावा घेण्यात आला. धुळे जिल्हयाचे खरीप हंगामाचे सरासरी क्षेत्र 375600 हेक्टर असून येत्या खरीप हंगामात सर्वसाधारणपणे458100 हेक्टर क्षेत्रावर पेरणी प्रस्तावित करण्यात आले आहे. यामध्ये प्रामुख्याने तृणधान्य 177700 हेक्टर, कडधान्य 44700 हेक्टर, गळीतधान्य, 46100 हेक्टर व कापूस 187600 हेक्टर क्षेत्राचा समावेश आहे.