जळगाव । जमिनीच्या उत्पादकतेविषयीच्या समस्या जाणून घेऊन त्यावर आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात. या उपाययोजनांच्या माध्यमातून शेतकर्यांना शाश्वत शेतीकडे वळविण्यासाठी शासनाने पुढाकार घेतला आहे. यासाठी जिल्हा मृद सर्व्हेक्षण मृद चाचणी कार्यालयातर्फे मृद आरोग्य पत्रिका कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमातंर्गत राज्यातील शेतकर्यांच्या जमिनीची आरोग्य पत्रिका तयार करण्यात येत आहेत. सन 2016-17 मध्ये जिल्हयातील 1078 गावामध्ये हा कार्यक्रम राबविण्यात आला आहे.
मृदा तपासणीकरून पिकांच्या उत्पन्नात होणार वाढ
मृद तपासणीवर आधारित अन्नद्रव्यांच्या कमतरतेनुसार खतांच्या संतुलित व परिणामकारक वापरास प्रोत्साहन देणे. जमिनीचे मृद आरोग्य सुधारण्यासाठी तसेच मुलद्रव्यांची परिणामकारकता वाढविण्यासाठी जैविक खते, सेंद्रीय खते, गांडूळ खत, निंबोळी, सल्फर आच्छादित युरियासारख्या संथ गतीने नत्र पुरवठा करणार्या खतांच्या वापरास प्रोत्साहन देणे. एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनाद्वारे पिकांच्या उत्पादकतेत वाढ करणे. क्षमता वृध्दी, प्रयोगशाळांच्या कार्यपध्दतीत सुधारणा घडवून आणणे. निर्धारित जिल्हयांमध्ये तालुका, हा या कार्यक्रमाचा प्रमूख उद्देश आहे.
जमिनीचा पोत सुधारणार
या कार्यक्रमात सार्वाधिक जामनेर तालुक्यातील 108 तर अमळनेर तालुक्यातील 102 गावांचा समावेश करण्यात आला आहे. तर चाळीसगाव व चोपडा तालुक्यातील प्रत्येकी 33 हजार 819 तर जामनेर तालुक्यातील 30 हजार 304 शेतकर्यांना मृद आरोग्य पत्रिकांचे वाटप करण्यात आले आहे. मृद नमुने तपासणीकरीता जिल्हयात शासकीय प्रयोगशाळेसह जिल्हयातील सहा खाजगी प्रयोगशाळांची मदत घेण्यात येत आहे. या प्रयोगशाळांमध्ये 96 हजार 750 मृद आरोग्य पत्रिकेसाठी आवश्यक घटकांसाठी मृद नमुने तपासण्याची क्षमता आहे.