शिरपूर । महाराष्ट्र शासनाने शेतकर्यांना छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजनेंतर्गत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऐतिहासिक 34 हजार कोटी रक्कमेची कर्जमाफी देतांना तातडीने 10 हजार रूपयांची उचल देण्याबाबत अध्यादेश जारी केला आहे. मात्र आपल्या बँकेच्या विविध शाखांत उचल मागणीसाठी जाणार्या शेतकर्यांना विपरीत अनुभव येत आहे. बँकेकडे निधी शिल्लक नसल्याचे कारण दाखवून शेतकर्यांना परत पाठविले जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात स्पष्ट आदेश केलेले असतांनाही आपल्या बँकेेने शेतकर्यांना रूपये 10 हजार उचल न देण्याचे धोरण स्विकारले आहे. तरी शिरपूर तालुक्यातील व शहरातील शेतकर्यांना रूपये 10 हजार उचल देण्यात यावे असे निवेदन शिरपूर येथील जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेचे विभागीय अधिकारी जी.झेड.चैधरी, शाखाधिकारी सौ.पी.एस.ठाकरे यांना शिरपूर भाजपाच्या वतीने भाजपा जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी, जिल्हा सरचिटणीस अरूण धोबी, तालुकाध्यक्ष राहूल रंधे, शहराध्यक्ष हेमंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले.
जिल्हा बँकेवर काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता असल्याने शासन आदेशाची पायमल्ली
निवेदनात पुढे म्हटले आहे की, शासनाच्या आदेशाची अंमलबजावणी न करता आपण शासनाची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे तसेच जिल्हा बँकेवर काँग्रेस, राष्ट्रवादीची सत्ता असल्याने सूड भावनेतून राज्यातील सत्तारूढ भाजपा शासनाची पायमल्ली केली जात असल्याचे म्हटले आहे. निवेदन देतेवेळी भाजपाचे किशोर माळी, संजय आसापूरे, चंद्रकांत पाटील, आबा धाकड, तालुका सरचिटणीस दिपक ठाकूर, महेंद्र पाटील, निलेश महाजन, शहर उपाध्यक्ष राहूल देवरे, प्रशांत चौधरी , अविनाश शिंपी, प्रताप सरदार, मुबिन शेख, जाकीर तेली, अरमान मिस्तरी, दिपक जमादार, हेमराज राजपूत, विक्की चौधरी , नंदू माळी, हिम्मतसिंग राजपुत, भटू माळी, संदिप माळी, डॉ.शशिकांत गुजर, जयवंत पाटील, धनंजय पाटील, प्रल्हादसिंग राजपूत, सचिन शर्मा, नितिन कुमावत, आत्माराम भिल, महेंद्र धोबी, सुभाष राजपूत, उदयभान पावरा, सुनिल माळी, सुकदेव कोळी, संतोष कोळी, राजू परदेसी, अशोक पाटील, महिपेंद्र रावळ, भूषण पाटील, भारत पावरा, नंदलाल मराठे, कुबेर जमादार, शिवानंद बंजारा, हेमराज पाटील, गोकूळ भिल, हिम्मत शिरसाठ, गणपत बंजारा, धनराज बंजारा, श्रावण कोळी, अभिमन बंजारा, रेहमान पावरा, छगन पावरा, सोमा पावरा, मांगिलाल पावरा, शिवदास पावरा, बाबुलाल पावरा, पुरूषोत्तम पाटील, पुना वाघ आदी पदाधिकारी कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.