दोंडाईचा । रासायनिक खतांच्या व बियाण्याच्या वाढलेल्या किंमती, शेतकर्यांकडून बेसुमार होणारा खतांचा व किटक नाशकांच्या वापरामुळे शेतकरी दिवसेंदिवस कर्जाच्या खाईत लोटला जात आहे. खर्च करून अपेक्षीत उत्पादन न मिळाल्याने शेतकरी कर्ज बाजारीपणा व नैराश्यातुन आत्महत्या सारखा मार्ग जवळ करीत आहेत. मात्र शेतकर्याने देशीगाय, गांडूळ प्रकल्प व मधमाशीचे शास्त्रोक्त पध्दतीने पालन केल्यास कमी खर्चात शेती चांगली शेती होवुन उत्पादनात वाढ होवु शकते असे सुप्रकृती प्रतिष्ठानचे संस्थापक तथा मधमाशी पालनतज्ञ डॉ. तुकराम निकम यांनी दिले.
शेतकर्यांची परिस्थिती बदलेल
ते सावळदे ता.शिरपुर येथील प्रगतीशिल शेतकरी सचिन राजपूत यांच्या शेतात आज झालेल्या मधमाशी पालन कार्यशाळेत ते बोलत होते. डॉ. निकम यांनी इस्त्राईलमध्ये झालेल्या कृषी क्रांतीत मधमाशीपालनाचा खुप मोठा वाटा आहे. तेथे मधमाशी पालन हा स्वतंत्र उद्योग म्हणुन विकसित झाला असल्याची माहिती दिली. राज्यातील शेतीची परिस्थिती पाहता शेतकर्यांनी या उद्योगाकडे वळण्याची गरज प्रतिपादन केली.
यांची होती उपस्थिती
दोंडाईचा येथील सपना मधमाशी पालन व प्रशिक्षण केंद्रातर्फे झालेल्या कार्यशाळेसाठी माजी आमदार बापूसाहेब रावल, प्रा.के.यु.राजपूत, के.बी.पाटील, श्री.चौधरी सर, जे.एम.पावरा, आय.एच.खान, अतुल राजपूत यांच्यासह शेतकरी उपस्थित होते. यावेळी मधमाशी पालनासंदर्भातील साहित्याचे वितरण झाले. जयपालसिंह गिरासे यांनी सुत्रसंचालन करून आभार मानले. सावळदे, बाबुळदे, कुरखळी, पिंप्रीसह शिरपूर परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.