नवापूर । येथील आदिवासी सहकारी साखर कारखाना नंदुरबार विभाग लि. सुरूपसिंग नाईक नगर डोकारे ता. नवापूर या कारखान्याची 20वी सर्वसाधारण सभा चेअरमन शिरीषकुमार नाईक यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. प्रस्तावना श्री. कुशारे यांनी तर अहवाल वाचन शिरीष नाईक यांनी केले. यावेळी श्री. नाईक यांनी आपला ऊस आपल्याच कारखानर्याला देण्याची विनंती करत ऊसाला चांगला भाव देण्याचे अश्वासन दिले. याप्रसंगी माजी खासदार माणिकराव गावीत, व्हाइस चेअरमन सखाराम गावीत, छगन वसावे, नथ्थुदादा गावीत, मगन गावीत, भामटुभाऊ कोकणी, विनोद नाईक, विनाताई वसावे व आदी संचालक तसेच बाजार समिती सभापती दिपक नाईक, पंस उपसभापती दिपीप गावीत, आर. सी. गावीत, नवलसिंग गावीत, जालमसिंग गावीत, बाळु महाराज, पी.डी.महाजन, भुपेंद्र वसावे, आदी पदाधिकारी उपस्थित होते.
कारखान्याद्वारे वेळेवर पेमेंट
शिरीष नाईक यांनी पुढे सांगितले की, काही शेतकर्यांनी गुजरात राज्याच्या कारखान्यांना दिला असता त्याचे पेमेंट आजपर्यंत मिळाला नसल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. यातून शेतकर्यांची आर्थिक फसवणूक होवून नुकसान झाले असल्याचे निदर्शनास आणून दिले. सर्व शेतकर्यांनी आदिवासी कारखान्याला ऊस देण्याचे आवाहन केले. गाळप झालेल्या ऊसाचे पेमेंट तोडणी व वाहतुकीचे पेमेंट तसेच कामगारांचा पगारही वेळेवर दिला जात असल्याचे सांगितले. सुत्रसंचालन व आभार दिलीप पवार यांनी मानले.