जळगाव। शेतकर्यांनी शेतीबरोबरच कुकुटपालन, शेळीपालन, मत्सपालन, दुग्धव्यवसाय यासारखे कृषीपुरक उद्योग सुरु करुन आपले उत्पन्न वाढवावे. असे आवाहन आत्मा चे प्रकल्प संचालक शिवाजी आमले यांनी केले. भारतीय कृषि अनुसंधान परिषद, नवी दिल्ली पुरस्कृत कृषि विज्ञान केंद्र, पाल यांच्यातर्फे नवभारत मंथन (2017-2022) संकल्प ते सिध्दी मेळावा आणि शासनाच्या योजना अधिकाधिक जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी शासन विविध उपक्रम राबवित असते. या उपक्रमाचा एक भाग म्हणून गणेशोत्सवाच्या काळात ‘संवाद पर्व’ हा विशेष उपक्रम माहिती व जनसंपक महासंचालनालयाच्यावतीने राबवण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत जिल्हा माहिती कार्यालय, जळगावच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘संवाद पर्व’ या उपक्रमाच उद्घाटन आमले यांच्या हस्ते आज पाल येथे संपन्न झाले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरुन ते बोलत होते.
शासन योजनांचा शेतकर्यांनी लाभ घ्यावा
उपस्थितांना मार्गदर्शन करतांना आमले म्हणाले की, केंद्र शासनाने शेतकरी केंद्रबिंदू माणून 2022 सालापर्यंत शेतकर्यांचे कृषि उत्पन्न दुप्पट करण्याचा संकल्प केला आहे. या संकल्पाचा भाग म्हणून नवभारत मंथन अंतर्गत संकल्प ते सिध्दी या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. शेतकर्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन शेती व्यवसाय करावा तसेच शेतीचे उत्पन वाढण्यासाठी शेतीपुरक व्यवसाय सुरु करावेत. जेणेकरुन शेतीला पुरक उत्पन्न सुरु होईल. यासाठी शासन विविध योजना राबवित असून या योजनांचा शेतकर्यांनी लाभ घेण्याचे आवाहनही त्यांनी केले.
व्यासपीठावर जिल्हा परिषद सदस्या पुष्पाताई तायडे, कृषि उपसंचालक (आत्मा) अनिल भोकरे, जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके, सातपुडा विकास मंडळाचे सचिव अजित पाटील, कृषि विज्ञान केंद्र, पाल चे प्रमूख डॉ. ईश्वर सिंह गोविंद राम, मुमराबाद कृषि विज्ञान केंद्राचे कापूस पैदासकार डॉ. संजीव पाटील, तेलबिया संशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. एन. एम. पाटील, उपविभागीय कृषि अधिकारी नारायण देशमुख, लोखंडे, जैन उद्योग समुहाचे उपाध्यक्ष बी. ए. पाटील, प्रयोगशील शेतकरी वसंतराव महाजन, कृषि साधना पुरस्कार प्राप्त शेतकरी विकास महाजन आदि मान्यवर उपस्थित होते.
‘लोकराज्य’ स्टॉलला उत्स्फुर्त प्रतिसाद
गणेशोत्सवाच्या काळात ‘संवाद पर्व’ हा विशेष उपक्रम माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्यावतीने राबवण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत जिल्हा माहिती कार्यालय, जळगावच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘संवाद पर्व’ या उपक्रमाचे उद्घाटन कृषि विज्ञान केंद्र, पाल येथे करण्यात आले. तसेच महाराष्ट्र शासनाचे मुखपत्र असलेल्या लोकराज्य मासिकाचा स्टॉलही लावण्यात आला होता. या स्टॉलला उपस्थित शेतकर्यांनी भेट देउन लोकराज्य मासिकाचे सामुहिक वाचन केले. तसेच शासनाच्या विविध योजनांची माहिती करुन घेतली. लोकराज्य मासिकाचा ऑगस्ट 2017 चा अंक हा शेतकरी कर्जमाफी यावर असल्याने या अंकास स्टॉलवर अधिक मागणी होती.
विविध स्टॉल थाटले
प्रास्ताविकात डॉ. ईश्वरसिंह यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नवभारत मंथनसाठी केलेला संकल्प सांगितला. यामध्ये उत्पादन वाढ, शास्त्रीय शेतीचा प्रभावी वापर, उत्पादनानंतर होणारे नुकसान कमी करणे, उत्पादनाची गुणवत्ता वाढ, वितरण प्रणालीतील खर्च कमी करणे, जोखीम कमी करणे, शेतीपुरक उद्योग सुरु करणे आदि बाबींचा समावेश असून याबाबत माहिती देण्यात आली. याठिकाणी जिल्हा माहिती कार्यालयाने लोकराज्य मासिकाचा तर कृषि विज्ञान केंद्र, पाल व मुमराबाद यांनी शेती उपयोगी विविध वस्तु, अवजारे, खते, बी- बीयाणे यांचे स्टॉल लावण्यात आले होते.