नांद्रा । येथील शेतकरी कौशल्याबाई प्रजापत यांनी आपल्या दोन एकरशेतावर जैन सोलर पंप बसवल्यामुळे या भागात हा पहिलाच सोलर पंप असल्यामुळे परीसरातील शेतकर्यांना कुतूहलता असल्यामुळे शेतकरी पहाण्यासाठी येतांना दिसत आहेत. नको वीज, नको डिझेल, नको पर्यावरणाचा र्हास, सौर पंपाच्या वापराने करू शेतीचा विकास या उक्ती प्रमाणे आता इंधन व विजेशिवाय जैन सोलर पंप कौशल्याबाई प्रजापत यांनी आपल्या शेतात बसवला आहे. त्यामुळे पिकांना पाणी देणे शक्य झाले आहे. अटल सौर कुर्षी योजनेतुन महावितरण कंपनीकडून हा सौर पंप बसवला आहे.
शेतकर्यांना 95 टक्के अनुदान
अल्पभुधारक शेतकर्यांना ह्या योजनेतुन शेतकर्यांना सौर पंप बसवून मिळणार आहे. या योजनेत शेतकर्यांना 95 टक्के अनुदान मिळणार आहे शेतकर्यांना फक्त 5 टक्के पैसे भरावे लागणार आहे. यासाठी श्री प्रजापत यांना 5 लाख 40 हजार किंमतीच्या या सौर पंपासाठी 27हजार रुपये खर्च आला आहे.नांद्रा येथे मुख्य रस्त्यावर बसवलेला हा सौर पंप येणार्या जाणार्याचे लक्षवेधून घेत आहे.पाच एकरच्या आतील शेतकर्यांना 5 टक्के तर 10 एकर च्या आतिल शेतकर्यांना 15 टक्के रक्कम भरावी लागणार आहे.साठी त्यांना जैन गुर्पचे श्री थाळकर यांचे मार्गदर्शन लाभले .नुकतीच या पंपाची चाचणी घेण्यात आली. त्यावेळी धिरज प्रजापत, योगेश सुर्यवंशी, बंटी सुर्यवंशी, संदीप सुर्यवंशी उपस्थित होते.