शेतकर्‍यांनी रुईचे प्रमाण जास्त असलेल्या कापसाचे उत्पादन घ्यावे

0

जळगाव । खान्देशात कापसाचे पिक मोठ्या प्रमाणावर घेतले जोते. मात्र, या कापसाची क्वालिटी व यातील रूईचे प्रमाण कमी असल्यामुळे यामालाला भारता बाहेर मागणी कमी असून शेतकर्‍यांनी शेतकर्‍यांनी रुईचे प्रमाण जास्त असणार्‍या कापसाच्या बियाणांची लागवड करावी, त्यामुळे कापसाची निर्यात वाढेल, असे आवाहन खान्देश जिनींग प्रेसींग फॅक्टरी ओनर्स असोशिएशनचे अध्यक्ष प्रदिप जैन यांनी केले. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. याप्रसंगी विशाल राजे भोसले, जीवन बयास व असोशिएशनच्या पदाधिकार्‍यांची उपस्थिती होती़

निर्यात वाढीचा शेतकर्‍यांना फायदा
जैन यांनी पुढे यांनी सांगितले की, त्यांनी असोशिएशनच्या माध्यमातून निर्यातीसंदर्भात विविध देशांतील कंपन्याशी चर्चा केली. मात्र, क्वालिटी व कापसातील रुईचे प्रमाण कमी असल्यामुळे खान्देशातील कापसला निर्यात करतांना अडचणी येत असल्याचे लक्षात आले. जोपर्यंत निर्यात वाढणार नाही तोपर्यंत शेतकर्‍यांना चांगला भाव मिळणार नाही म्हणून शेतकर्‍यांनी यंदा रुईचे प्रमाण जास्त असलेल्या कापसाच्या बियाण्यांची लागवड करावी असे आवाहन जैन यांनी केले.

उतारा तपासणी यंत्र
कापसाची निर्यात वाढून शेतकर्‍यांना चांगला भाव मिळेल़ यासाठी असोसिएशनने कापसाचा उतारा तपासण्याचे यंत्र उपलब्ध केले आहेत़ या यंत्रात कापसाचा उतारा चांगला आल्यास शेतकर्‍यांना इतर मालापेक्षा 400 ते 500 रुपये भाव जास्त देण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्यावर्षी 14 ते 15 लाख गाठी खान्देशातून तयार करण्यात आल्या होत्या. यापैकी 30 ते 40 टक्के निर्यात खान्देशातून झाली आहे.

शेतकर्‍यांना मोफत वाटप
शेतकर्‍यांना कापूस लागवड करतांना अडचणी लक्षता घेवून त्यांना मार्गदर्शक होईल अशी ‘कमी खर्च जास्त उत्पन्न’ पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. ही पुस्तिका जीनींग प्रेसमध्ये शेतकर्‍यांना मोफत वाटप करण्यात येणार आहे. निर्यातीचे प्रमाण वाढावे व खेडा खरेदीद्वारे शेतकर्‍यांची होणारी फसवणूक टाळण्यासाठी शेतकर्‍यांनी दर्जेदार उत्पादन घेऊन थेट जिनिंगमध्ये विक्री करावी, असेही जैन यांनी सांगितले़