शेतकर्‍यांसाठी वाढदिवशी अनिल भाईदास पाटील यांचे उपोषण

0

अमळनेर- बोंडअळी नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना बागायतीप्रमाणे नुकसान भरपाई मिळावी, यासह विविध मागण्यांसाठी अनिल भाईदास पाटील यांनी अमळनेरातील तहसील कार्यालयासमोर 7 जुलै रोजी सकाळी 11-5 यावेळेत एक दिवसीय लाक्षणिक उपोषण पुकारले आहे.
अमळनेर तालुक्यासह पाच तालुक्यांच्या शेतकर्‍यांसाठी संजीवनी असलेले पाडळसरे धरणाचे काम तत्काळ सुरू करणत यावे, पोकळ आश्‍वासने बंद करावी, शेतकर्‍यांचा 7/12 कोरा करावा, बोंडअळी नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना बागायती प्रमाणे नुकसान भरपाई तत्काळ मिळावी, पीक विम्याची रक्कम शेतकर्‍यांच्या खात्यावर तत्काळ जमा करावी,अमळनेर तालुका व संपूर्ण शहरात कायदा व सुव्यवस्थेसाइी शहरातील सर्व प्रकारचे अवैध धंदे तळापासून नेस्तानाभूत करून कायमचे हद्दपार करण्यात यावे, शहरात वाढलेले चोरीचे प्रमाण टारगट टवाळखोरांचा बंदोबस्त करावा, आदी मागण्या अनिल भाईदास पाटील यांनी केल्या आहे.