शेतकर्‍यांसाठी विरोधी पक्षांची संघर्षयात्रा 16 एप्रिलला शिरपूरमध्ये

0

शिरपूर । संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील शेतकरी बांधवांना कर्जमाफी मिळावी यासाठी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस तसेच मित्रपक्षांनी महाराष्ट्र राज्यभर संघर्ष यात्रा काढण्यात आली आहे.

रविवार दि. 16 एप्रिल रोजी शिरपूर येथे संघर्ष यात्रा पोहचणार असून दुपारी 12.30 वाजता आर.सी.पटेल फार्मसी कॉलेजच्या भव्य मैदानावर जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील विविध भागातून संघर्ष यात्रा रविवार दि. 16 एप्रिल रोजी शिरपूर येथे पोहचेल. महाराष्ट्र काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोकराव चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराजचव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, विरोधी पक्षनेते राधाकृष्णविखे पाटील, विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांच्यासह आमदार अमरिशभाई पटेल, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, आमदार काशिराम पावरा, आमदार डी.एस.अहिरे, शिरपूरच्या लोकनियुक्त् नगराध्यक्षा जयश्रीबेन पटेल, उपनगराध्यक्ष भुपेशभाई पटेल, जिल्हयातील नेते, विरोधी पक्षाचे अनेक नेते उपस्थित राहतील.