शेतकर्‍यांसाठी शिवसेना उतरली रस्त्यावर

0

भुसावळ । राज्यातील शेतकरी अतिवृष्टी, नापिकता, दुष्काळ परिस्थितीमुळे हवालदील झाला आहे. कर्जाचे डोंगर शेतकर्‍यांच्या डोक्यावर असून शेतमालास हमीभाव मिळत नाही त्यामुळे आत्महत्यांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे शेतकर्‍यांना विज बिल व कर्ज माफ करावे या मागणीसाठी वरणगाव, रावेर, यावल, मुक्ताईनगरला शिवसेनेतर्फे तर बोदवडला शेतकरी संघटनेतर्फे सोमवार 5 रोजी सकाळी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

मुक्ताईनगरात रास्ता रोको
शिवसेनेतर्फे मुक्ताईनगरातील प्रवर्तन चौकात रास्ता रोको करण्यात आला़ शिवसेना जिल्हा प्रमुख चंद्रकांत पाटील शिवसेना तालुका प्रमुख छोटू भोई, विठ्ठल तळेले, प्रवीण चौधरी, राजेंद्र तळेले, आकाश सापधरे, शुभम तळेले, संतोष कोळी व शिवसैनिक प्रसंगी उपस्थित होत़े रास्ता रोकोमुळे वाहतूक ठप्प झाली.

यावल येथे अटक व सुटका
कजर्माफीसह वीज बिल माफी, केळीला फळाचा दर्जा या मागण्यांसाठी शिवसेनेच्या वतीने भुसावळ टी पॉईंट रास्ता रोको करण्यात आला़ आंदोलनामुळे वाहतूक अर्धा तास ठप्प झाली़ तालुकाप्रमुख कडू पाटील, शहरप्रमुख जगदीश कवडीवाले, माजी नगराध्यक्ष दीपक बेहेडे, शरद कोळी, संतोष धोबी, मुन्ना पाटील यांच्यासह कार्यकर्त्यांनी रास्ता रोको केले़ कार्यकर्त्यांना अटक करून नंतर सुटका करण्यात आली़

रावेर येथे निदर्शने
रावेर येथेही रास्तारोको करण्यात आला. जिल्हा उपप्रमुख प्रल्हाद महाजन, तालुका प्रमुख योगीराज पाटील, जिल्हा युवा अधिकारी अविनाश पाटील, प्रविण पंडीत, अशोक शिंदे, अ‍ॅड. जे.जी. पाटील, लक्ष्मण मनोरे, वाय.व्ही. पाटील, कमलाकर पाटील, रविंद्र पवार, भास्कर पाटील, मुबारक तडवी, अनिल पाटील, पंडीत पाटील, वसंत पाटील, गोपाल मिस्तरी, समाधान महाजन, कैलास धनके, राजू लोहार, सतीष पाटील, कल्याण पाटील, प्रमोद कोंडे, विश्‍वनाथ कोळी, योगेश धनके, तुकाराम कोळी यांचा सहभाग होता.

बोदवडला शेतकरी संघटनेतर्फे रास्ता रोको
शेतकरी कृती समितीतर्फे मलकापूर चौफुल्लीवर रस्तारोको आंदोलन करण्यात आले. यावेळी नायब तहसिलदार वाडीलाल राठोड यांनी आंदोलनस्थळी येऊन निवेदन स्विकारले. पुरुषोत्तम पाटील, चेतन तांगडे, अमोल देशमुख, नाना पाटील यांनी मत मांडले. निवेदनात शेतकर्‍यांना कर्जमुक्ती झाली पाहिजे. विज बिल माफ झाले पाहिजे. सरकारने निवडणूकीपूर्वी जाहिर नाम्याचे पालन करावे, शेतकर्‍यांच्या मुलास मोफत शिक्षण मिळावे. बियाणे, खते यांचे भाव कमी करावे, स्वामीनाथन आयोग लागू करण्यात यावा, शेतकर्‍यांना पेन्शन योजना लागू करावी आदी मागण्यांचे निवेदन देण्यात आले. तसेच 15 ऑगस्ट पर्यंत या मागण्या पुर्ण न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. निवेदनावर दगडू शेळके, नाना पाटील, संदीप चिंचोले, गणेश पाटील, संजय पाटील, देवेंद्र जैस्वाल, चेतन तांगडे, पुरुषोत्तम पाटील, दीपक लघुरे, विष्णु काळे, मधुकर पाटील, अक्षय पाटील, अमोल देशमुख, निवृत्ती ढोले, भुषण पाटील, संजय वराडे, अमोल राजपूत देवांनद माळी, गौरव सोनवणे, शुभम सोनवणे, संतोष पाटील, राजू चौधरी आदींच्या स्वाक्षर्‍या आहेत.

वरणगाव येथे बसस्थानक चौकात अडविली वाहने
संपूर्ण महाराष्ट्रात गेल्या चार दिवसा पासुन शेतकर्‍यांना कर्ज मुक्त करण्यासाठी सुरु असलेल्या संपाला सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेनेने पाठींबा दिला आहे. त्याच अनुशंगाने वरणगांव येथे राष्ट्रीय महामार्गावर बसस्थानक चौकात शिवसेनेच्या वतीने रास्तारोको करण्यात आला. दुपारी 12 वाजता तालुका प्रमुख एस.डी. महाजन यांच्या नेतृत्वात रास्तारोको करुन रहदारी थांबण्यात आली होती. या रस्तारोको मध्ये विलास मुळे, निलेश ठाकुर, अब्रार खान, शेख जमिर, विकास पाटील, रमेश भदाणे, भैय्या देशमुख, बाळु चव्हाण, प्रा. विनोद गायकवाड, बापू मराठे, सुभाष झोपे, संभाजी पाटील, निळु सरोदे, सतिष जैन, यशवंत बढे आदी शिवसैनिक हजर होते. पोलीसांनी सदर आंदोलन कर्त्यांना अटक करुन सोडून देण्यात आले. सदर आंदोलनाला मुक्ताईनगर उपविभागीय पोलीस अधिकारी सुभाष नेवे, एपीआय गांगुर्डे, पीएसआय निलेष वाघ व पोलीस कर्मचारी यांनी चोख बदोबस्त ठेवण्यात आला.