शिक्रापूर : रिलायंस गॅस कंपनीच्या पाईपलाईनच्या कामात शेतकर्याच्या झालेल्या नुकसानभरपाईच्या कागदपत्रांवर बनावट सह्या करून त्या सह्या खर्या असल्याचे भासवून करंदी (ता. शिरूर) येथे शेतकर्यांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी शिक्रापूर पोलिसांनी सहा जणांवर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत या जमिनीचे मालक रामराव सुभाणराव मासुळकर (रा. उध्यमनगर शिवनेरी, पिंपरी, पुणे) यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे. त्यानुसार शिक्रापूर पोलिसांनी रिलायंस कंपनीचे सक्षम अधिकारी एल. आर. गोतारणे (रा. तळेगाव दाभाडे, ता. मावळ, जि. पुणे), एस. डी. भिसे, अभिजित भिंगारे (रा. पुणे), विनोद सुभाष दौंडकर (रा. शेलपिंपळगाव, ता. खेड, जि. पुणे), नवनाथ बाजीराव दौंडकर (रा. भोसरी पुणे), नंदू भयीरट (रा. न्हावरा, ता. शिरूर, जि. पुणे) यांच्यावर फसवणूकप्रकरणी गुन्हे दाखल केले आहेत.
नुकसान भरपाई दिली नाही…
याबाबत मिळालेली माहिती अशी, करंदी (ता. शिरूर) येथे रामराव मासुळकर (रा. पिंपरी) पुणे यांनी 2005 साली काही शेतजमीन विकत घेतली होती. त्यानंतर 2007 मध्ये त्यांच्या शेतामधून रिलायंस कंपनीच्या गॅस लाईनचे पाईप टाकत असल्याचे दिसले. त्यावेळी मासुळकर यांनी हे काम थांबविले असता त्यांना तेथील रिलायंस कंपनीच्या अधिकार्यांनी त्यांना तुमच्या नुकसानीचा पंचनामा होऊन तुम्हाला नुकसानभरपाई मिळेल, असे सांगितले. त्यांनतर त्यांनी त्या ठिकाणी पंचनामा देखील केला. परंतु त्यांनतर त्या शेतकर्याला त्यांच्या कार्यालयात बोलावून नुकसानभरपाईच्या काही रकमेचा धनादेश दिला. पुढील तपास शिक्रापूर पोलीस करत आहे.