चाळीसगाव । हाताच्या पंजा जवळील नस कापून तालुक्यातील बिलाखेड येथील 40 वर्षीय शेतकर्याने आपली जीवन यात्रा संपवल्याची दुःखद घटना दि 25 एप्रिल 2017 रोजी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास घडली असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. शेतकर्यावर विजेचे बिल सह सोसायटीचे कर्ज व मुलीच्या लग्नाचे कर्ज कर्ज होते या प्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
घरी कुणी नसतांना शेतकरी वसंत हिरामण पाटील (40) रा बिलाखेड ता चाळीसगाव यांनी 25 एप्रिल 2017 रोजी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास उजव्या हाताच्या पंजा जवळील नस कापून घेतल्याने अति रक्तस्राव झाला बराच वेळ ते जागेवर पडून होते. घरचे लोक शेतात असल्याने त्यांना सदर प्रकार कळल्यानंतर त्यांनी वसंत पाटील यांना लागलीच शहरातील साईकृष्ण हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी घेऊन गेले असता तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. याबाबत माहिती जाणून घेतली असता वसंत पाटील यांची बिलाखेड शिवारात जवळपास अडीच एकर कोरडवाहू जमीन असून मागील वर्षी त्यांच्या मुलीचे लग्न झाले आहे. त्यांचे वर सोसायटीचे कर्ज व जास्त प्रमाणात विजेचे बिल होते व मुलीच्या लग्नात देखील त्यांनी बाहेरून कर्ज घेतले असल्याची चर्चा आहे. त्यांच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त होत असून बिलाखेड सजाचे तलाठी मनोज शिरसाठ यांनी पंचनामा करून वसंत पाटील यांच्या कडे शेतजमीन असून ते शेतकरी असल्याचे दैनिक जनशक्तीशी बोलतांना सांगितले. मयत शेतकर्याचे पश्चात पत्नी 2 मुले, 2 मुली असा परिवार आहे. या प्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.