शेतकर्‍याला लाखात गंडवले

0

निजामपूर । साक्री तालुक्यातील माळमाथा परिसरातील छावड़ी येथील शेतकरी संदीप श्रीराम पाटील याच्या बचत खात्यातुन एक लाख रुपये बँक कर्मचारी सांगून अज्ञात इसमाने काढल्याची फिर्याद निजामपुर पोलीस स्टेशनला शेतकरी संदीप पाटील यांनी दिली आहे.पाटील यांच्याकडून घाईघाईने आधार व एटीएम चे 16 अंकी पासवर्ड नंबर घेऊन पैसे परस्पर काढले गेले. दुसर्‍या दिवशी ‘आपके खाते मे से पैसा निकला गया है आपके खाते मे चालीस हजार बचे है’ असा फोन आला असता लामकणी गावी एटीएम कार्ड घेऊन बॅलेन्स चेक केला असता फक्त आठशे रूपये शिल्लक आढळून आले. निजामपुर शाखेत विवरण घेतल्यानंतर निजामपुर पो.स्टे.त फसवणूकीची फिर्याद देण्यात आली. सदर घटनेमुळे साक्री-निजामपुर परिसरात खळबळ उडाली असून एटीएमधारकांमध्ये घबराट पसरली आहे. तपासाअंती अनेकांना गंडविल्याची प्रकरणे समोर येण्याची शक्यता आहे.

बँक कर्मचारी सांगून साधला संवाद
“मी आरबीआय मधुन बोलतो तुमचा एटीएम कार्ड सुधारित करायचे आहे. तुमचा आधार कार्ड व एटीएमचा 16 अंकी आकड़ा सांगा म्हणजे तुमचा एटीएम सुधारित करु नाहीतर तुमचा एटीएम कार्ड कायम स्वरूपी बंद होईल.”