साक्री । तालुक्यातील नांदवन(शिवपाडा) शिवारात नितीन तानाजी देसले राहणार कासारे व शेतमजूर रतीलाल यादव सोनवणे राहणार त्रिशूलपाडा हे दोन्ही गहू कापत असताना बिबट्याने या दोघांवर हल्ला केला. यात दोन्ही गंभीर जखमी झाले आहेत. दोघांवर साक्री ग्रामीण रुग्णालयात उपचार देण्यात आले व पुढील उपचारासाठी धुळे जिल्ह्या रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. साक्री तालुक्यात बिबट्याचा मुक्त संचार वाढल्याने शेतकरी वर्गामध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. वनवभागाने बिबट्याचा त्वरित बंदोबस्त करावा, अशी मागणी कासारे गावाचे लोकनियुक्त सरपंच विशाल देसले यांनी केली आहे.