शेतकर्‍यास मारहाण : मेंढपाळासह पाच जणांविरुद्ध मुक्ताईनगर पोलिसात गुन्हा

0

मुक्ताईनगर : तालुक्यातील पिंप्री अकराऊत शिवारातील शेतात अनधिकृतपणे मेंढ्या जनावरे घुसवल्यानंतर शेतकर्‍याने हटकल्याने यांचे वाईट वाटून मेंढपाळासह इतर पाच जणांनी शेतकर्‍यांस लाठ्या काठ्यांनी मारहाण केल्याची घटना मंगळवार, 21 एप्रिल रोजी घडली होत. या प्रकरणी शेतकर्‍याच्या फिर्यादीवरून सहा जणांविरुद्ध मुक्ताईनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तालुक्यातील पिंप्री अकराऊत शिवारातील शेतात मेंढपाळाने अनधिकृतपणे मेंढ्या व जनावरे घुसवून उडीद, मूक पिकाचे अतोनात नुकसान केले. या प्रकरणी शेतकरी ज्ञानेश्वर शंकर ठोके (रा.धनगर वाडा, मुक्ताईनगर) यांनी हटकल्याने त्याचा राग येऊन मेंढपाळ बाळू ठेलारी (रा.सातोड, ता.मुक्ताईनगर) याने अनधिकृतपणे अनोळखी पाच जणांना सोबत घेत शेतकर्‍याला लाठी-काठीने मारहाण केली. या प्रकरणी सहा जणांविरुद्ध मुक्ताईनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.