जळगाव: उद्या बुधवारी संपूर्ण महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंता वाढली आहे. कापसासह, ज्वारी, मका, सोयाबीन पिकांचा हंगाम तोंडाशी आलेला असतांना अवकाळी पावसाच्या संकेतामुळे चिंता वाढली आहे. गेल्या चार दिवसांपासून वातावरणात बदल झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यातच उद्या मुसळधार पावसाचा अंदाज असल्याने चिंतेत भर पडली आहे.
कापूस वेचणीचा हंगाम सुरु आहे, पाऊस झाल्यास मोठे नुकसान होणार आहे.