शेतकऱ्यांचे प्रश्न निकाली काढण्यासाठी सहा दिवसांचा अवधी – आमदार बच्चू कडू

0

अकोला : शेतकऱ्यांचे प्रलंबित प्रश्न निकाली काढा असा अल्टिमेटम बच्चू कडू यांनी राज्य सरकारला दिला आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न निकाली काढण्यासाठी 19 ते 24 नोव्हेंबर असा सहा दिवसांचा अवधी त्यांनी सरकारला दिला आहे. दरम्यान सरकारने मागण्या पूर्ण करण्यासाठी 20 दिवसांचा वेळ मागितला आहे.

आमदार बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांच्या तुरीचे चुकारे देण्यास उशीर केल्याबद्दल प्रशासनाला चांगलंच धारेवर धरलं. बच्चू कडू म्हणालेत की, पुढच्या पंधरा दिवसांत शेतकऱ्यांच्या तुरीचे चुकारे द्या, अन्यथा विभागीय मार्केटिंग अधिकाऱ्याचं कार्यालय जाळून टाकू अशी धमकीही त्यांनी दिली आहे.