औरंगाबाद: आज गुरुवारी औरंगाबाद येथे महाएक्स्पोचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याहस्ते करण्यात आले. महाएक्स्पोत एकाच ठिकाणी अनेक वस्तूंची विक्री होत आहे. यातून मोठ्या प्रमाणात आर्थिक उत्पन्न मिळणार आहे. दरम्यान यावेळी बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना कर्जमुक्त करणारच असे पुनरुच्चार केले.
तसेच येळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देशात आर्थिक मंदी आहे, मात्र त्यातून मार्ग काढण्याची आवश्यकता आहे. नुसती आर्थिक मंदी असल्याने रडून चालणार नाही. त्यातून मार्ग काढणे आवश्यक असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. संकटावर मात करण्याची ताकत मराठवाड्यात आहे. ते संकट दूर होईल आणि आर्थिक सुब्बता नक्की येईल असा विश्वास व्यक्त केला.
महिलांमध्ये उपजत उद्योगाचे गुण असते, त्या गुणांना वाव देण्याचे काम आमचे सरकार करणार आहे. महिलांना फक्त चूल आणि मुल इतकेच न ठेवता त्यांनाही उद्योगाच्या संधी उपलब्ध होण्याचे प्रयत्न सरकार करणार आहे असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.