जळगाव : मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार प्रथमच जळगावात कार्यक्रमानिमित्त एकत्र आले आहेत. पद्मश्री आप्पासाहेब पवार आधुनिक कृषी उच्च तंत्र पुरस्कार वितरण सोहळ्यानिमित्त मुख्यमंत्री आणि शरद पवार एकत्र आले आहे. जैन हिल्स येथे हा कार्यक्रम होत आहे. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकार पूर्णपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी असून कर्जातून शेतकऱ्यांना मुक्त करण्यासाठी सरकारने पाऊल उचलले आहे. राज्य शासनाने जाहीर केलेली कर्जमाफी ही प्रथमोपचार शेतकऱ्यांना कर्जाच्या विळख्यातून हे काढण्यासाठी आवश्यक ते सर्व उपाय केले जातील असे आश्वासन दिले.
भविष्यातील शेतीचे चित्र मला आज या कार्यक्रमातून दिसते. भविष्यात शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची आवश्यकता आहे, ते तंत्रज्ञान जैन इरिगेशनने विकसित केल्याने भविष्यात शेतकरी आधुनिक होईल असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध करून देण्याची आवश्यकता असल्याचे मला लक्षात आले असून त्यासाठी आवश्यक पाऊले उचलण्याचे आश्वासनही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले.