शेतकऱ्यांना तातडीने कर्ज पुरवठा करा; मुख्यमंत्र्यांची बँकांना ताकीद

0

मुंबई: पावसाळा तोंडावर येऊन ठेपला आहे. त्यामुळे शेतकरी शेतीच्या कामाला लागला आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना खरीप कर्जाची आवश्यकता आहे. दरम्यान आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना तातडीने कर्जपुरवठा करा अशी सक्त ताकीद दिली आहे. आज पत्रकारांशी संवाद साधताना मुख्यमंत्र्यांनी ही माहिती दिली. शेतकऱ्यांना वेळोवेळी मदत करण्यासाठी राज्य सरकार सकारात्मक असून आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी आहोत अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली.