नवी दिल्ली-नरेंद्र मोदी सरकारने देशभरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला असून खरीप हंगामातील १४ पिकांचा हमीभाव वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. हंगामातील १४ पिकांचा हमीभाव दीडपटीने वाढवण्यास मोदी सरकारने मंजुरी दिली आहे. धान्याच्या हमीभावात २०० रुपये प्रती क्विंटल वाढ करण्यात येणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.